HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्राने लसीकरणाचा वेग दुप्पट करावा, प्रकाश जावडेकरांची विनंती

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाने गंभीर रुप धारण केलं आहे. राज्यात दिवसेंदिवस २५-३० हजारांच्या पुढे नवे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमिवर महाराष्ट्रातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवावा असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी वेगाने लसीकरण होणे आवश्यक आहे. याच संदर्भात आता महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राला आवश्यकतेनुसार लसीचा पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. “केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. विके पॉल यांच्याशी चर्चा केली, त्यांनी महाराष्ट्राला आवश्यकतेनुसार/प्रत्यक्षातील लसीकरणानुसार कोविड लसीचा पुरवठा करण्याचं आश्वासन दिलंय. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्यांनी आता लसीकरण सध्या आहे त्यापेक्षा दुप्पट करावं.” असं ट्वीट प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.

आधी महाराष्ट्रात लसीचा साठा शिल्लक असल्याचा दावा..

याआधी राज्य सरकारकडे लसीचा साठा शिल्लक असल्याचा दावा प्रकाश जावडेकर यांनी केला होता. महाराष्ट्र शासनाने राज्यात पाठविल्या गेलेल्या एकूण ५४ लाख लसींपैकी फक्त २३ लाख लस १२ मार्चपर्यंत वापरल्या आहेत. ५६ टक्के लस वापराविना पडून आहेत. आता, शिवसेनेचे खासदार राज्यासाठी अधिक लस देण्याची मागणी करत आहे. पहिल्यांदा साथीचा आजार रोखण्यात अपयश आता लसीकरणातही ढिसाळ कारभार, अशी टीका जावडेकर यांनी केली होती.

कोरोनाच्या लसीकरणावरून प्रकाश जावडेकरांनी दिला महाराष्ट्र सरकारला ‘डोस’

‘केंद्राकडून महाराष्ट्राला आतापर्यंत ५४ लाख लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. परंतु, महाराष्ट्रानं केवळ २३ लाख लसीच्या डोसांचाच वापर केला आहे. याचाच अर्थ ५६ टक्के लसीचा वापरच झालेला नाही’ असा आरोप जावडेकर यांनी केला आहे. यानंतरही, शिवसेनेचे खासदार संसदेत राज्यासाठी अतिरिक्त लशीचा पुरवठा करण्याची मागणी करत आहेत.कोरोना महामारीच्या काळात ‘गैरव्यवस्था’ आणि आता लसीकरणादरम्यान ‘चुकीच्या प्रशासकीय हाताळणी’ दिसून येत आहे. महत्वाची बाब म्हणजे, आज (१७ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणासंबंधी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. मात्र, त्या आधीच अगोदर प्रकाश जावडेकर यांनी हे ट्विट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३१ जुलैनंतर लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

News Desk

कोरोनाचे आव्हान कायम ! कुठेही गर्दी, नियमांचे उल्लंघन चालणार नाही । मुख्यमंत्र्यांचे आदेश

News Desk

स्थलांतरितांसाठी विशेष रेल्वेने प्रवासाची केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची परवानगी

News Desk