HW News Marathi
Covid-19

राज्यात कोरोनाचा आकडा २१५, तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याचं सरकारसमोर संकट !

पुणे | महाराष्ट्रात आणखी 22 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता रुग्णांची संख्या 215 वर पोहचली आहे. नवीन रुग्णांमध्ये मुंबईत सर्वाधिक10 तर पुण्यात पाच, नागपुरात तीन, नगरमध्ये दोन आणि सांगली, बुलडाणा जळगावात प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली आहे. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. लॉकडाउन (संचारबंदी) असतानाही नागरिकघराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढू लागल्याने विषाणूचे संक्रमण सुरुच असल्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील 35 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडले आहे. मात्र, पुढील 14 दिवस कुटुंबासह समाजातील कोणत्याही व्यक्‍तींच्या संपर्कात येणार नाही, असे लेखी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे. बरे होऊन घरी गेलेला रुग्ण घराबाहेर फिरताना दिसल्यास त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिलाआहे. पुढील 14 दिवस काय करायचे आणि काय करणार नाही, याबाबत त्यांच्याकडून लेखी घेण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनची नवी नियमावली आजपासून लागू

News Desk

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी

News Desk

मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तोबा गर्दी, हजारोंच्या जमावाकडून लॉकडाऊनच्या नियमांची ऐशीतैशी

News Desk