HW News Marathi
मनोरंजन महाराष्ट्र

येत्या काळात महाराष्ट्र राज्य कबड्डीत देशात अव्वल असेल: होनप्पा गौडा

– वसुंधरा फाऊंडेशनच्या कबड्डी चषक २०२३ चे थाटात उद्घाटन
– अभिनेते भाऊ कदम, तेजा देवकर यांच्या विनोदांनी जिंकली प्रेक्षकांची मने
– वर्सटाईल ग्रुपने सादर केले गाणे आणि लावणी
– जितेंद्र तुपे आणि श्वेता दांडेकर यांच्या गायनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगोली: कबड्डी हा खेळ खऱ्या अर्थाने मातीतील आणि उत्साह वाढविणारा खेळ आहे. वसुंधरा फाऊंडेशनतर्फे हिंगोली जिल्ह्यातून कबड्डी खेळाडू तयार होण्यासाठी होत असलेले प्रयत्न निश्चितच फळाला येतील. येत्या काळात कबड्डीच्या बाबतीत हिंगोलीचे नाव देशपातळीवर चमकेल, अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार होनप्पा गौडा यांनी व्यक्त केला. ते वसुंधरा फाऊंडेशनतर्फे रामलीला मैदानावर आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनवेळी शुक्रवारी (ता. १५) बोलत होते.

पुढे बोलताना होनप्पा गौडा म्हणाले की, मला इथे बोलविल्याबद्दल मी वसुंधरा फाउंडेशनचे आभार मानतो. आज मी जो आहे तो यापूर्वी असा नव्हतो. मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती आहे. आज सर्व सुविधा उपलब्ध आहेत. प्रत्येकाला खेळात पुढे जाण्याची इच्छा असते. मात्र, हिरमोड झाल्यावर कबड्डी सोडून देतात. मात्र, कबड्डी तुम्हाला सोडत नाही. हे लक्षात असू द्या. महाराष्ट्रात खरे कबड्डी खेळाडू महाराष्ट्रात आहेत. आज मी केवळ महाराष्ट्रामध्ये घडलो. माझ्या कारकिर्दीत २५ वर्षात मी महाराष्ट्रात सर्वाधिक सामने खेळले. मी टिकून राहिलो म्हणून ओळख निर्माण झाली. आज यश आणि अपयश आले तरीही कबड्डीला सोडू नका. तुम्हाला कबड्डी सोडणार नाही. तुम्हाला एकच सांगतो व्यसन करू नका. येत्या काळात महाराष्ट्र कबड्डीत देशात अव्वल असेल. तुम्ही खेळाडू या नात्याने कबड्डीचा आदर करा, कबड्डी तुमचा आदर करेल.

वसुंधरा फाउंडेशन अध्यक्षा मनीषा काटकर प्रस्तावनेत म्हणाल्या की, आज मोठे अधिकारी आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आपल्यासाठी आले आहेत. त्यांच्याकडे बघून आपल्या खेळाडूंना नक्कीच शिकायला मिळेल. कबड्डी हा उत्साह आणि ऊर्जेचा खेळ आहे. मी यासाठी परिश्रम घेतलेल्या प्रत्येकाचे आभार व्यक्त करते.

सुवर्णपदक विजेत्या स्नेहल शिंदे म्हणाल्या की, हिंगोलीसारख्या जिल्ह्यात इतकी मोठी स्पर्धा होत आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना १३२ गावात काटकर दाम्पत्यांनी कबड्डी पोहोचवली. ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्यासारख्या लोकांनी पुढाकार घेतल्यास कबड्डीला चांगले दिवस बघायला मिळतील. पुढच्या वर्षी महिलांची कबड्डी स्पर्धा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करते.

मीरा भायंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर म्हणाले की, हिंगोली जिल्हा हा कबड्डीचा जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्याचे स्वतंत्र ओळख आता निर्माण होत आहे. १३२ गावांना कबड्डी विलेज म्हणून निर्माण करण्यासाठी आम्ही काम करतोय. खेळ ही एकमेव धर्मनिरपेक्ष गोष्ट आहे. या माध्यमातून किमान ५० विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी नाम फाउंडेशन सहकार्य करणार आहे. आजी स्पर्धा इथपर्यंत गट स्तरावरून राज्यस्तरीय पर्यंत येऊन पोहोचली आहे. आतापर्यंत २९ गावांमध्ये स्पर्धा झाली. ही एकमेव स्पर्धा १००% टक्के लोक सहभागातून झाली आहे. यातून नवी ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करतो.

कबड्डी चषक २०२३चे उद्घाटक तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, कबड्डी तुमच्यात असेल, तर तुम्हाला कुठल्याही ओळखीची आवश्यकता भासणार नाही. कबड्डीचा माध्यमातून नवी ओळख निर्माण होईल. या जिल्ह्याच्या विकासाचे चक्र सुरू होईल.

यावेळी छत्रपती पुरस्कार प्राप्त आणि आशियाई
वसुंधरा फाऊंडेशनतर्फे आयोजित कबड्डी चषक २०२३ च्या उद्घाटन समारंभाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे सीईओ संजय दैने, अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार होनप्पा गौडा, पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी,भारतीय ऑलम्पिक संघटनेचे सदस्य सचिन भोसले, आणि छत्रपती पुरस्कार प्राप्त, आशियाई सुवर्णपदक विजेत्या स्नेहल शिंदे, जगदीश खुराणा, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक बाबुराव चांदोरे, खजिनदार मंगल पांडे, ज्ञानदेव पायगव्हाणे, सुषमा पायगव्हाने, बार कौन्सिल उपाध्यक्ष सतीश देशमुख, माजी शिक्षण अधिकारी शिवाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी कबड्डी चषक २०२३ मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला शुभेच्छा दिल्या.

सांस्कृतिक कार्यक्रमात वर्सटाईल ग्रुपने अग्निपथ चित्रपटातील देवा श्री गणेशा या गाण्यावर समूह नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे उपस्थित त्यांना सुर नवा ध्यास नवा या मालिकेतील फेम जितेंद्र तुपे यांनी माऊली माऊली रूप तुझे… राधा ही बावरी हरीची, मल्हारवारी… हे गीत गायले. इंडियन आयडॉल मराठी फेम श्वेता दांडेकर हिने ग पोरी नवरी आली, सैराट चित्रपटातील हळद पिवळी पोरं कवळी, लल्लाटी भंडार… ही गीते गायली. लावणी सम्राज्ञी तेजा देवकर हिने चंद्रमुखी चित्रपटातील थांबला का उंब्र्याशी… या लावणीवर नृत्य सादर केले. चला हवा येवू द्या फेम भालचंद्र ऊर्फ भाऊ कदम आणि रेणुका राजशिखरे या दोघांनी स्किट सादर केले. या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हिंगोलिकरांची मने जिंकली.
कबड्डी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गोविंद डिके – पाटील, नीलेश तिडके, नीलेश नाथ, दिनेश मंगिराज, अक्षय झायले, राहुल सोनवणे, गजानन काळेवर, जगन्नाथ भगत, जगदीश खंदारे, विशाल शिंदे आणि स्वप्नील बदक आदी परिश्रम घेत आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मैदानावर सर्व सहभागी संघाचे स्वागत करण्यात आले आणि प्रार्थना म्हणण्यात आली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबईहून खास आलेल्या ग्रुपने गाण्याचे आणि लोककला लावणीचे सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख पानपट्टे यांनी केले. आभार गोविंद डिके- पाटील यांनी मानले.

हजारो प्रेक्षकांनी बघितले लाईव्ह: राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील सर्व सामने देशभरातील प्रेक्षकांनी वसुंधरा फाउंडेशनच्या अधिकृत फेसबुक आणि यूट्यूब चैनलवर बघितले.

आज यांचे झाले सामने
आज बी. सी. फाउंडेशन (पुणे), वसुंधरा फाउंडेशन – ब (हिंगोली), शिवमुद्रा क्रीडा संघ (कोल्हापूर), साई क्रीडा संघ (परभणी), मोरया क्रीडा मंडळ (ठाणे), जय हिंद क्रीडा मंडळ (धुळे), सतेज क्रीडा मंडळ (पुणे), छावा क्रीडा मंडळ (कोल्हापूर), मिड लाईन (रायगड), वसुंधरा फाउंडेशन – ब (हिंगोली), एन टी पी सी संघ (नंदुरबार), ओम कबड्डी संघ (कल्याण), शाहू क्रीडा मंडळ (कोल्हापूर), आझाद क्रीडा मंडळ (नगर), जय बजरंग क्रीडा मंडळ (ठाणे), भैरवनाथ क्रीडा संघ (पुणे), युनिटी फाउंडेशन (परभणी), रेणुकादेवी (नांदेड), स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई), राकेशभाऊ कबड्डी संघ (पुणे) यांच्यात १६ लढत झाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे गोळीबार प्रकरण, अल्पवयीन मुलासह चौघांविरोधात मोक्कांतर्गत कारवाई

News Desk

भाजपने राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही – सचिन सावंत

News Desk

अादिवासी भागातील मुलांनी अनुभवली सचिनची १०,००० धावा केलेली बॅट

News Desk