पालघर | लॉकडाऊनच्या काळात गैरसमजातून पालघरमध्ये मॉब लिंचिंगप्रकरणात आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या पाच जणांना आज (१ मे) न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या ५ जणांना न्यायालयाने १३ मेपर्यंत सीआयडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ११५ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी ९ जण अल्पवयीन असल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे.
Maharashtra: The five people, who were arrested in connection with the Palghar lynching case, have been remanded to the custody of the Crime Investigation Department (CID) till May 13. https://t.co/VorvqGE26p
— ANI (@ANI) May 1, 2020
पालघरच्या डहाणू तालक्यात कासा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गडचिंचले गावात दोन साधू आणि वाहनचालकाची चोर असल्याच्या गैरसमजातून गावकऱ्यांनी हत्या केली होती. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध आता ड्रोनच्या मदतीने घेतला जाणार आहे. पालघर प्रकरणावर देशभरात या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही फोनवरून बोलणे झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २० एप्रिल रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.