HW News Marathi
Covid-19

राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान, एकूण ५९ हजार ५४६ रुग्णांची संख्या

मुंबई । राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज (२८ मे) ६९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५९ हजार ५४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख १९ हजार ४१७ नमुन्यांपैकी ५९ हजार ५४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६ लाख १२ हजार ७४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ४९ (मुंबई ३८, वसई विरार ४, ठाणे ४, नवी मुंबई २, रायगड १), नाशिक-१ (जळगाव १), पुणे- २६ (पुणे मनपा १०, सातारा ९, सोलापूर मनपा ७), औरंगाबाद- ३, लातूर-१ (नांदेड मनपा), अकोला- ५ (अकोला मनपा ५).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६० पुरुष तर २५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ८५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. या ८५ रुग्णांपैकी ४५ जणांमध्ये (५३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १५ मे ते २५ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४८ मृत्यूंपैकी मुंबई २२, सोलापूर -५ , अकोला -४, औरंगाबाद -३, सातारा -३, ठाणे -३, वसई विरार -३, जळगाव -१, नांदेड -१, नवी मुंबई -१, पुणे -१ आणि रायगड येथील १ मृत्यू आहे.

राज्याची कोरोनाबाधितांची आकडेवारी

  • मुंबई – कोरोनाबाधित रुग्ण- ३५,४८५, बरे झालेले रुग्ण – ८६५०, मृत्यू – ११३५, ॲक्टिव्ह रुग्ण- २५६९४
  • ठाणे – कोरोनाबाधित रुग्ण- ८२२०,बरे झालेले रुग्ण- २३००, मृत्यू- १५५, ॲक्टिव्ह रुग्ण- ५७६५
  • पालघर – कोरोनाबाधित रुग्ण- ८२५, बरे झालेले रुग्ण- २७३, मृत्यू- २३, ॲक्टिव्ह रुग्ण- ५२९
  • रायगड – कोरोनाबाधित रुग्ण- ९४४, बरे झालेले रुग्ण- ४८८, मृत्यू- २६, ॲक्टिव्ह रुग्ण- ४२८
  • नाशिक – कोरोनाबाधित रुग्ण- १०४३, बरे झालेले रुग्ण- ७५५, मृत्यू- ५२, ॲक्टिव्ह रुग्ण- २३६
  • अहमदनगर – कोरोनाबाधित रुग्ण- ९२, बरे झालेले रुग्ण- ४८, मृत्यू- ६, ॲक्टिव्ह रुग्ण- ३८
  • धुळे: बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (६७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)
  • जळगाव – बाधित रुग्ण- ५२६, बरे झालेले रुग्ण- २३९, मृत्यू- ५२, ॲक्टिव्ह रुग्ण- २३५
  • नंदूरबार – कोरोनाबाधित रुग्ण- ३२, बरे झालेले रुग्ण- २०, मृत्यू- ३, ॲक्टिव्ह रुग्ण- ९
  • पुणे – बाधित रुग्ण- ६८९६, बरे झालेले रुग्ण- ३२४२, मृत्यू- ३०१, ॲक्टिव्ह रुग्ण- ३३५३
  • सोलापूर – बाधित रुग्ण- ७११, बरे झालेले रुग्ण- ३०३, मृत्यू- ५९, ॲक्टिव्ह रुग्ण- ३४९
  • सातारा – कोरोनाबाधित रुग्ण- ४२९, बरे झालेले रुग्ण- १२८, मृत्यू- १६, ॲक्टिव्ह रुग्ण- २८५
  • कोल्हापूर – कोरोनाबाधित रुग्ण- ३५१, बरे झालेले रुग्ण- ३६, मृत्यू- १, ॲक्टिव्ह रुग्ण- ३१४
  • सांगली – कोरोनाबाधित रुग्ण- १०१, बरे झालेले रुग्ण- ४६, मृत्यू- १, ॲक्टिव्ह रुग्ण- ५४
  • सिंधुदुर्ग – कोरोनाबाधित रुग्ण- १९,बरे झालेले रुग्ण- ७, ॲक्टीव्ह रुग्ण- १२
  • रत्नागिरी – कोरोनाबाधित रुग्ण- २०४, बरे झालेले रुग्ण- ७६, मृत्यू- ५, ॲक्टिव्ह रुग्ण- १२३
  • औरंगाबाद – कोरोनाबाधित रुग्ण- १३७०, बरे झालेले रुग्ण- ८७९, मृत्यू- ६०, ॲक्टिव्ह रुग्ण- ४३१
  • जालना – कोरोनाबाधित रुग्ण- ८७, बरे झालेले रुग्ण- २४, ॲक्टिव्ह रुग्ण- ६३
  • हिंगोली – कोरोनाबाधित रुग्ण- १४३, बरे झालेले रुग्ण- ९२, ॲक्टिव्ह रुग्ण- ५१
  • परभणी – कोरोनाबाधित रुग्ण- ४०, बरे झालेले रुग्ण- १, मृत्यू- १, ॲक्टिव्ह रुग्ण- ३८
  • लातूर – कोरोनाबाधित रुग्ण- १०७, बरे झालेले रुग्ण- ५०, मृत्यू- ३, ॲक्टिव्ह रुग्ण- ५४
  • उस्मानाबाद – कोरोनाबाधित रुग्ण- ५४, बरे झालेले रुग्ण- १२, ॲक्टिव्ह रुग्ण- ४२
  • बीड – बाधित रुग्ण- ४१, बरे झालेले रुग्ण- ३,ॲक्टिव्ह रुग्ण- ३८
  • नांदेड – कोरोनाबाधित रुग्ण- १०८, बरे झालेले रुग्ण- ६९, मृत्यू- ६, ॲक्टिव्ह रुग्ण- ३३
  • अकोला -कोरोनाबाधित रुग्ण – ५२९, बरे झालेले रुग्ण- २५०, मृत्यू- २८, ॲक्टिव्ह रुग्ण- २५०
  • अमरावती – कोरोनाबाधित रुग्ण- १९७, बरे झालेले रुग्ण- ९०, मृत्यू- १४, ॲक्टिव्ह रुग्ण- ९३
  • यवतमाळ – कोरोनाबाधित रुग्ण- ११६, बरे झालेले रुग्ण- ९२, ॲक्टिव्ह रुग्ण- २४
  • बुलढाणा – कोरोनाबाधित रुग्ण- ५५, बरे झालेले रुग्ण- २८, मृत्यू- ३, ॲक्टिव्ह रुग्ण- २४
  • वाशिम – कोरोनाबाधित रुग्ण- ८, बरे झालेले रुग्ण- ५, ॲक्टिव्ह रुग्ण- ३
  • बुलढाणा – बाधित रुग्ण- ५५, बरे झालेले रुग्ण- २८, मृत्यू- ३, ॲक्टिव्ह रुग्ण- २४
  • वाशिम – कोरोनाबाधित रुग्ण- ८,बरे झालेले रुग्ण- ५, ॲक्टिव्ह रुग्ण- ३
  • नागपूर – कोरोनाबाधित रुग्ण- ४९५, बरे झालेले रुग्ण- ३३६, मृत्यू- ९, ॲक्टिव्ह रुग्ण- १५०
  • वर्धा – कोरेनाबाधित रुग्ण- ११, मृत्यू- १, ॲक्टिव्ह रुग्ण- १०
  • भंडारा – बाधित रुग्ण- २०, बरे झालेले रुग्ण- १, ॲक्टिव्ह रुग्ण- १९
  • गोंदिया – कोरोनाबाधित रुग्ण- ५१,बरे झालेले रुग्ण- १, ॲक्टिव्ह रुग्ण- ५०
  • चंद्रपूर – कोरानाबाधित रुग्ण- २५, बरे झालेले रुग्ण- ५, ॲक्टिव्ह रुग्ण- २०
  • गडचिरोली – बाधित रुग्ण- २८, ॲक्टिव्ह रुग्ण- २८
  • इतर राज्ये – बाधित रुग्ण- ५४, बरे मृत्यू- १३,ॲक्टिव्ह रुग्ण- ४१
  • एकूण – कोरोनाबाधित रुग्ण – ५९,५४६, बरे झालेले रुग्ण- १८,६१६, मृत्यू- १९८२, ॲक्टिव्ह रुग्ण- ३८,९३९
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाजपने मराठा आरक्षणविरोधातील लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली”, काँग्रेसचा गंभीर आरोप

News Desk

पुण्याच्या अनलॉक नियमांत बदल, सुरु झालेली ‘ही’ दुकाने होणार बंद!

News Desk

खुर्चीत बसून गांजा पित बोलणे सोपे आहे; किशोरी पेडणेकरांचा विरोधकांना टोला

Aprna