HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पुर्णपणे अनलॅाक होणार,राजेश टोपेंचे संकेत !

अहमदनगर | महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून लॅाकडाऊन सुरू आहे.मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र आता राज्य पुर्णपणे अनलाॅक होण्याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘राज्यात आता लॉकडाऊनचा विषय राहिलेला नाही. येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार’, असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

राजेश टोपे अहमदनगरमध्ये बोलत होते,“कोरोनावर अद्याप प्रतिबंधक लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार आहे,” असेही राजेश टोपे म्हणाले.

“येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्यात सर्व काही अनलॉक केलं जाणार आहे. पुढील काही दिवसात राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल,” अशी अपेक्षा करूया असे राजेश टोपे म्हणाले

Related posts

एकनाथ खडसेंनी मोदींविरोधातील रिट्विट केलेले ट्विट केले डिलिट

News Desk

‘ग्लोबल टीचर पुरस्कारा’मुळे भारताची मान उंचावली । दत्तात्रय भरणे

News Desk

पंकजा मुंडे देणार मंत्रिपदाचा राजीनामा ?

News Desk