HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आघाडीचा असेल !

मुंबई | लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी आपल्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, शनिवारी (१३ जुलै) शनिवारी अखेर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. “राज्यात पुढील मुख्यमंत्री आघाडीचा असेल. आम्ही सर्व नेते आता एकदिलाने काम करून येत्या काळात महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणू”, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

“माझ्यावर विश्वास ठेऊन सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. यंदाच्या लोकसभेनंतर आता राज्यात आमच्यासमोर मोठे आव्हान आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांचा राज्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या जनसंपर्काच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करु”, असे बाळासाहेब थोरात यांनी यावेळी म्हटले आहे. “आमच्या पक्षातून काही लोक गेले. पण जेव्हा कोणी पक्ष सोडून जाते तेव्हा त्यांच्याजागी नव्या लोकांना संधी मिळून तरुण नेतृत्व निर्माण होण्यास मदत मिळते. म्हणूनच आम्हाला गेलेल्या लोकांची चिंता नाही”, असेही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

Related posts

शिवकुमार यांच्यासह नसीम खान, मिलिंद देवरा पोलिसांच्या ताब्यात

News Desk

मुख्यमंत्री महोदय टोल चालकांनाही देशभक्ती शिकवा! : सचिन सावंत

News Desk

आज भाजपचे उपोषण

News Desk