HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांकडे १२ नावांची यादी पोहोचली, प्रतीक्षा निर्णयाची!

मुंबई | राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर आज अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवनह मंत्री अनिल परब आणि अमित देशमुक यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली. त्यानंतर या तिघांनीही राज्यपालांशी काहीवेळ चर्चा केली. मात्र, राज्यपालांना देण्यात आलेल्या नावांचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. आता ही यादी राज्यपालांकडे आल्यानंतर राज्यपाल त्यावर कधीपर्यंत निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी चार-चार सदस्यांची नावं राज्यापालांना दिली आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी जे निकष आहेत. त्या निकषानुसारच ही यादी महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या वादावादी नंतर आता राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आमदार निलेश लंकेंनी अरेरावी, शिवीगाळ, मारहाण केली नाही’

News Desk

सायबर सिक्युरिटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग! – उपमुख्यमंत्री

Aprna

निकालानंतर पहिल्यांदा सोनिया गांधींनी शरद पवारांसोबत फोनवर केली चर्चा

News Desk