HW News Marathi
देश / विदेश

शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरेंनी ३५,००० कोटींकडे वेधलं केंद्राचं लक्ष

मुंबई | देशात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची न्यायालयानेही दखल घेतली असून, आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी. देवेगौडा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील १३ नेत्यांनी केंद्र सरकारकडे तत्काळ मोफत लसीकरण सुरू करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करून एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवदेनात कोरोना परिस्थितीसंदर्भात करण्यात आलेल्या मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. देशात करोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील आरोग्य केंद्र आणि सर्व रुग्णालयांना विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर लक्ष्य केंद्रीत करावं.

तसेच, केंद्र सरकारने संपूर्ण देशात तत्काळ मोफत लसीकरण कार्यक्रम हाती घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षांतील नेत्यांनी केली आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पात ३५,००० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. हा निधी करोना लसीकरणासाठी वापरण्यात यावा, असंही नेत्यांनी म्हटलं आहे.

पत्रातून कोण कोणत्या नेत्यांनी मागणी केली?

विरोधी पक्षनेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या या निवेदनावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन, बसपा अध्यक्षा मायावती, फारूक अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राजदचे नेते तेजस्वी यादव, डी. राजा, सीपीआय(एम)चे नेते सीताराम येचुरी यांची नावे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत राष्ट्रपती भवनापर्यंत कॉंग्रेसचा मार्च, शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी कॉंग्रेस आक्रमक

News Desk

‘अमित शाह संसदेत आले, तर मी टक्कल करेन’, देरेक ओब्रायनचं अमित शहांना आवाहन

News Desk

आम्ही कलम ३७१ ला हातही लावणार नाही, अमित शाहांचे आश्वासन

News Desk