HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये पहिल्या फेरीत महाविकासआघाडीच्या सतीश चव्हाण यांची आघाडी

औरंगाबाद | संपूर्ण राज्याचे सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालांकडे लक्ष आहे. या निवडणुकीचे संपूर्ण निकाल आज (३ डिसेंबर) मध्यरात्रीपर्यंत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाबाबतची सद्यस्थितीची माहिती पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना 27 हजार 879 मते मिळाली असून ते आघाडीवर आहेत. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 10 हजार 973 मते मिळाली असून ते पिछाडीवर आहेत. सतीश चव्हाण यांना पहिल्या फेरीत तब्बल 16 हजार 906 मतांची आघाडी मिळाल्याचे पाहायला मिळते.

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलीच मोठी निवडणूक होत आहे ती पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक. म्हणूनच संपूर्ण राज्याचे या निवडणूकीच्या निकालाकडे लक्ष आहे. महाविकासआघाडी सरकार आणि भाजपने ही निवडणूक आणखी प्रतिष्ठेची बनवली आहे. म्हणूनच या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. दरम्यान, १ डिसेंबरला या निवडणुकीसाठी मतदान झाले. तर आज (३ डिसेंबर) मतमोजणी सुरू आहे. येत्या निवडणुकांच्या राजकीय समिकरणांच्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्त्वाची ठरत असल्याचेही म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज भाजपची पहिली यादी जाहीर होणार ?

News Desk

JEE आणि NEET परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, जाणून घ्या नवीन तारखा

News Desk

आम्हाला फक्त जनताच प्रश्न विचारु शकते | मुख्यमंत्री फडणवीस

News Desk