HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांवर टीका करण्यापूर्वी मंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले ते पहावे – महेश तपासे

मुंबई | शरद पवारसाहेबांवर टीका करण्याऐवजी तुम्ही कृषीमंत्री असताना काय दिवे लावले ते आधी पहावे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी अनिल बोंडे यांचा समाचार घेतला आहे.

शरद पवारसाहेबांवर टीका करणार्‍या माजी मंत्री अनिल बोंडे यांचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.शरद पवार देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी एका झटक्यात केली होती. तुम्ही मात्र तत्वत: आणि नियम अटी टाकून शेतकर्‍यांना झुंजवत राहिलात असा आरोप महेश तपासे यांनी केला.

अनिल बोंडे तुमच्या प्रदेशाध्यक्षांना शरद पवारसाहेबांवर पीएचडी करायला जमलं नाही तर तुम्हाला शरद पवार साहेब समजायला सात जन्म घ्यावे लागतील असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे.तुम्ही भाजपाच्या सत्तेत कृषीमंत्री होतात मग शेतकर्‍यांना काय दिलात याचे आत्मपरीक्षण करावे आणि नंतर लोकनेत्यावर बोलण्याचे धाडस करावे अशा शब्दात महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hw Exclusive | अमोल कोल्हेंच्या डाॅ. पत्नी केईएममध्ये निभावतायतं कर्तव्य !

Arati More

शिक्षण क्षेत्रातील भारतातील पहिले NFT लाँच!

Aprna

पब,डिस्को,बार यांना सवलतींचा प्रसाद मात्र गणेशोत्सव बंदिवासात!

News Desk