मुंबई। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आणि आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी घ्या 30 नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. मुंबईत त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पक्षाच्या विस्तारात व्यस्त आहेत. तेच, काँग्रेससोबतचे त्यांचे संबंध बिघडल्याचे चिन्ह आहेत. बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यात अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. तर काहींनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मोदी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेणार हे अपेक्षीत होतं.
I also spoke to PM Modi on Tripura violence: West Bengal CM Mamata Banerjee
If Akhilesh (Samajwadi Party chief Akhilesh Yadav) needs our help, then we are ready to extend help, says Mamata Banerjee on being asked about UP Assembly elections pic.twitter.com/V2XqY7mO4q
— ANI (@ANI) November 24, 2021
यासाठी येतील ममता मुंबईत
ग्लोबल बिझनेस समिटसाठी 30 नोव्हेंबरला मुंबईत येणार असल्याचं ममता बॅनर्जींनी सांगितलं. त्या 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत मुंबईत असतील. मुंबईत त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यासोबत, त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मुंबई भेट ही बिझनेस समिटसाठी असल्याचं त्या म्हणत जरी असल्या तरी देखील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीत कोणत्या राजकीय चर्चा होणार हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. संजय राऊत यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेनेच्या नेत्यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या कार्याचे अनेकदा कौतुक केले आहे. शिवसेनेनी नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल राज्याच्या निवडणुकीत भाजपविरोधात तृणमूल काँग्रेसला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. म्हणूनच राजकीय वर्तुळात आता तर्कवितर्कांना उधाण आलंय पण ममता कोणत्या मुद्द्यावर पवार आणि ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.