मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी काही वृत्तवाहिन्यांकडून त्याचप्रमाणे काही राजकीय नेतेमंडळी आणि राजकीय पक्षांकडून महाराष्ट्र सरकारसह मुंबई पोलिसांना सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकार आणि विशेषतः मुंबई पोलिसांवर या प्रकरणी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. याच पार्शवभूमीवर, मुंबई पोलिसांवर होणाऱ्या आरोपांविरोधात आता निवृत्त IPS अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे आयपीएस अधिकाऱ्यांच्या या भूमिकेचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वागत केले आहे. ते ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
Maharashtra Police & Mumbai Police have a reputation. Maharashtra Police is compared to Scotland Yard Police. The manner in which Mumbai Police was targetted in #SushantSinghRajput case, I welcome the PIL filed by retired IPS officers: Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/49YLuFdA4w
— ANI (@ANI) September 3, 2020
मुंबई पोलिसांबद्दल बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात, “महाराष्ट्र व मुंबई पोलिसांना एक वेगळा मान, एक वेगळी प्रतिष्ठा आहे. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉर्टलँड यार्डच्या पोलीस दलाशी केली जाते. मात्र, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांना ज्या पद्धतीनं निष्कारण लक्ष्य करण्यात येत आहे ते चुकीचं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांवर होणाऱ्या आरोपांविरोधात निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेचे मी स्वागत करतो”, असे गृहमंत्री म्हणाले. “काही वृत्तवाहिन्यांकडून चुकीच्या, खोट्या, निराधार आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या बातम्या दाखवल्या केल्या जात असून त्यावर प्रतिबंध आणावा”, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे.
याचिकाकर्ते निवृत्त IPS अधिकारी
राज्याचे माजी पोलिस महासंचालक एम. एन. सिंग, पी. एस. पसरिचा, डी. के. शिवानंदन, संजीव दयाळ, सतीश माथुर व के. सुब्रमण्यम तसेच माजी मुंबई पोलिस आयुक्त डी. एन. जाधव व माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी न्यायालयात बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू तपासाप्रकरणी मुंबई पोलिसांवर होणाऱ्या आरोपांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.