HW News Marathi
महाराष्ट्र

मनसुख हिरेन प्रकरण:  सचिन वाझेंचा अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळला

ठाणे | मनसुख हिरेन यांच्या हत्ये प्रकरणात वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना मोठा झटका मिळाला आहे. सचिन वाझे यांना अंतरिम दिलासाला देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कधीही अटक होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

या जामीन अर्जावर काल (१२ मार्च)सुनावणी झाली. सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी करणारा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला. त्यानुसार या प्रकरणातील महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे तपास अधिकाऱ्यांचे या अटकपूर्व जामीन अर्जावर काय म्हणणे आहे, ते पुढील सुनावणीत मांडले जावे असे आदेश माननीय न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सचिन वाझे यांनी केलेल्या सचिन वाझेंच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर १९ मार्चला होणार आहे.

सचिन वाझे यांच्यावर मनसुख हिरेन या ठाण्यातील व्यापाऱ्याची हत्या केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने दिलेल्या माहिती नुसार मनसुख यांची पत्नी विमला यांनी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकात FIR दाखल केली आहे. या एफआयआर नुसार सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. तसंच एफआयआर मध्ये पहिल्यांदा अज्ञात इसम असं आरोपीचे नाव नमूद करण्यात आलं होतं.

मात्र १० मार्चला पुन्हा विमला यांचा जबाब महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने नोंदवला. त्यावेळेस त्या आपल्या जबाबावर ठाम असल्याने ११ मार्च यादिवशी पुरवणी एफआयआर बनवण्यात आला. त्या पुरवणी एफआयआर मध्ये काही व्यक्तींची नावे आरोपींच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना कधीही अटक करु शकते या भीतीने सचिन वाझे यांनी लगेच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

सचिन वाझे यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जानुसार त्यांच्यावर हत्या, हत्येचा कट रचणे, गुन्हेगारी कृत्य आणि पुरावे नष्ट करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. यानुसार त्यांच्यावर ३०२, २०१, ३४ आणि १२० ( ब ) ही कलमे लावण्यात आली आहेत. त्यामुळे आता १९ मार्च या दिवशी सचिन वाझे यांचे भवितव्य ठरणार आहे. न्यायालय सचिन वाझे यांचा अटक पुर्व जामिन अर्ज मान्य करणार की फेटाळणार हे सर्वस्वी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे तपास अधिकारी हे न्यायालयात सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावर काय भुमिका मांडतात यावर अवलंबून आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोना रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या घटनांची जबाबदारी आता संचालकांची”, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित किंवा शून्य गुण 

News Desk

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीबाबत ठाकरे सरकार नागरिकांना मोठा दिलासा देणार ? 

News Desk