HW News Marathi
Covid-19

निर्जंतुकीकरणासाठी पुढचे २ दिवस मंत्रालय बंद

मुंबई | ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांचे निर्जंतुकीकरणासाठी उद्या म्हणजे २९ एप्रिल आणि ३० एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाचे काम २९ व ३० एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल! दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ५० लाखांवर

News Desk

केंद्र सरकारचा निर्णय, लसीच्या दोन डोसमधलं वाढवलं अंतर!

News Desk

दिलासादायक ! परळी तालुका कोरोनामुक्त

News Desk