HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षण मसुद्याच्या मंजुरीसाठी मंत्रिमंडळाची विशेष बैठक

मुंबई । वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत नाराज मराठा समाजातील विद्यार्थ्यी गेल्या १० दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकार शुक्रवारी अध्यादेश जारी करणार आहे.

या अध्यादेशाच्या मसुद्याला मंजुरी देण्यासाठी मंत्रिमंडळाची विशेष बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी बोलाविली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणाअंतर्गत होत असलेले २९६ विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले होते. त्या प्रवेशांना संरक्षण देण्यासाठी राज्य सरकार हा अध्यादेश जारी करणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने सरकारला मान्यता दिली आहे.

पदव्युत्तर वैद्यकीयची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २५ मेपर्यंत मुदत दिली असून ती ३० मे पर्यंत वाढवून देण्याची विनंती करणारा अर्ज सरकारने न्यायालयात केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CBIचे पथक मुंबईत ७ दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी आले तर क्वारंटाईन केले जाणार नाही – आयुक्त

News Desk

ममता बॅनर्जी मुंबईत पोहोचताच ​​​​​​​घेतले सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन!

News Desk

प्राचार्य चव्हाणांच्या निलंबनासाठी विद्यार्थ्यांचं उपोषण

News Desk