HW News Marathi
महाराष्ट्र

अ‍ॅड. जयश्री पाटलांमुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, बोलवता धनी सांगणार

मुंबई | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने CBI तपासाचा आदेश दिला. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाकडून संताप व्यक्त केला जात आहे. जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.

याचिकाकर्त्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने परिपत्रक जारी करुन दिला आहे. सुप्रीम कोर्टात निकाल लागताच अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा बोलवता धनी कोण, याचाही खुलासा करणार, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केल्याने आधीच वाद आहे त्यात आणखी भर पडली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं होतं.

तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं. त्याचवेळी अ‍ॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती.

अ‍ॅड. जयश्री पाटील काय म्हणाल्या?

अनिल देशमुख तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल, शरद पवारांचे तुमच्यावर वरदहस्त असाल, तरी तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. भलेही तुम्ही माझं नाव पोलीस डायरीत येऊ दिलं नाही. सरन्यायाधीशांनी म्हटलंय, यांचं नाव डायरीत का नाही, हे दबावतंत्र आहे. शरद पवारांकडून हा दबाव आणलाय. अनिल देशमुख तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही, असं जयश्री पाटील निकालानंतर म्हणाल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक

News Desk

“किती वर्ष महाराष्ट्रातल्या लोकांची फसवाफसवी?” – सोमय्या

News Desk

मनसेचे मुंबई, पुण्यातील २ मेळावे अचानक रद्द; कारण काय?

News Desk