HW News Marathi
देश / विदेश

मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार!

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाची सुनावणी आजपासून (२० जानेवारी) होणार होती. २५ जानेवारीपासून पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार होती. पण, आजच घटनापीठापुढे ही सुनावणी होणार होती. मात्र, आजची सुनावणीही पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार आहे. २०डिसेंबर २०२० रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती.अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसेच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे ही सुनावणी झाली होती.

यावेळी मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला होता. ‘शैक्षणिक आणि सामाजिक आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे. नोकरीमध्ये देखील आरक्षण देण्याची गरज असून वर्तमान परिस्थिती बघता मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज असल्याचं मुकुल रोहतगी यांनी सांगितले. तर ‘EWS ला १० टक्के आरक्षण देण्यात आले पण हाच समसमान हा न्याय मराठा समाजाला का नाही. आताच्या लोकसंख्येनुसार विचार करण्याची आवश्यकता आहे’, असा युक्तीवाद कपील सिब्बल यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे खासदार शांतनू सेन राज्यसभेतून निलंबित!

News Desk

“सरकारनं भींती उभारायचं काम करु नये”, राहूल गांधींचा केंद्राला खोचक सल्ला

News Desk

या वर्षी मान्सूनचा प्रवास वेळेत, अंदमानात मान्सून दाखल

News Desk