नवी दिल्ली | मराठा आरक्षणासंदर्भात आज (६ फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठापुढे सुनावणी होणार होती. ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला ८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. यावेळी सुप्रीम कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने जर ८ मार्चपर्यंत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली नसेल तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातूनच सुनावणी होईल असं स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाने सुनावणीचा कालावधी निश्चित केला असून ८ मार्च ते १८ मार्चदरम्यान ही सुनावणी पार पडणार आहे.
Maratha Reservation: Hearing commences before Constitution Bench.
Mukul Rohatgi tells court volumes of documents are being printed and it will take 2 weeks. Rohatgi asks court to fix the matter in 1st week of March to fix a date considering physical hearing might commence then. pic.twitter.com/j6mPxGIT2z
— Bar & Bench (@barandbench) February 5, 2021
मराठा आरक्षणासंदर्भात ८ ते १८ मार्च दरम्यान सुनावणी होणार आहे. ८,९ आणि १० मार्चला याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. १२,१५ आणि १६ मार्च सह १७ मार्चला या प्रकरणातील इतर बाजू ऐकून घेतल्या जातील. त्यानंतर महाधिवक्त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. ८ मार्च ते १८ मार्च दरम्यान मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यानच सकारात्मक संकेत देत तीन ते चार आठवड्यांनी यावर सुनावणी सुरु करु म्हणजे तोपर्यंत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली असेल असं सांगितलं होतं. राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी यांनी कोर्टात सुनावणीदरम्यान सांगितलं की, दस्तऐवजांच्या खंडांच्या प्रिंट काढायच्या असून त्यासाठी किमान दोन आठवडे लागणार आहेत. यामुळे प्रत्यक्ष सुनावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु करण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.