HW News Marathi
देश / विदेश

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्वाचा निर्णय होणार

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज (७ जुलै) महत्वाचा दिवस आहे. मराठा आरक्षणाचे प्रकरण ५ न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकांवर सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेते या प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत.

मागच्या वेळी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला नकार दिला होता. पण सोबतच हा अंतरिम निर्णय असून याचे भवितव्य अंतिम निकालावर अवलंबून असेल असे सांगितले होते.

मराठा आरक्षणाच्या विरोधात जयश्री पाटील यांची मूळ याचिका असून मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावे अशी मागणी केली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवादाचा मार्ग पत्‍करलेल्या मुलांना त्यांच्या आईने घरी परत बोलवावे !

News Desk

१२ लाख कोटींच्या नवीन नोटा चलनात- अर्थ मंत्री , अरुण जेटली

News Desk

राहुल गांधींचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार ! नाना पटोले

News Desk