HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय हे राज्यकर्ते सांगून का टाकत नाहीत? ब्राह्मण महासंघांचा सवाल

पुणे | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. यामुळे राजकारण चांगलचं तापलं आहे. अशात मराठा समाज मोठा आक्रमक झाला आहे. त्यानंतर आता ब्राह्मण महासंघही आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाचा पोपट मेला आहे, ही गोष्ट राज्यकर्ते लोकांना सांगत का नाहीत, असा सवाल ब्राह्णण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे.

ते आज (११ मे) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणासाठी आता पुन्हा न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार. कोणी विधानसभेत ठराव मंजूर करायला सांगणार, कोणी पंतप्रधानांना नियम बनवायला सांगणार. खूप प्रेमाचे संबंध असणाऱ्या राज्यपालांना साकडे घालूनही काय होणार, याची सरकारलाही कल्पना असेल.

मराठा तरुणांसाठी नोकरीत वेगळा कोटा ठेवू, असे विजय वडेट्टीवार सांगतात. पण हे मागच्या दाराने दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, ही बाब त्यांनाही माहिती असेल. हे सर्व करण्यापेक्षा आर्थिक आरक्षणाचा आग्रह धरावा, असे आनंद दवे यांनी म्हटले आहे.

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याची किंवा कायदे तोडण्याची भाषा नेत्यांकडून अनेकदा केली जाते. मात्र, या सर्व गोष्टी न्यायालयात गेल्यानंतर रद्द होतील. त्यापेक्षा मराठा समाजाच्या तरुणांना तांत्रिक शिक्षण द्या. सुलभ कर्ज द्या. पायाभूत सुविधा पुरवा, तशा संस्था उभारा, असे आनंद दवे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रत्येक निवडणुकीला चिन्ह बदलतच विजय मिळवत आलो आहे !

News Desk

कांदा निर्याती संदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा !

swarit

“नारायण राणेंनी मार्च ही जास्तच मुदत दिली त्याबद्दल त्यांचे खास आभार!” – जयंत पाटील

News Desk