HW News Marathi
देश / विदेश

मराठा आरक्षण | ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करा, राज्य सरकारची मोदींकडे मागणी

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (८ जून) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठक पावणे दोन तासानंतर संपली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरु झाली ती पावणे दोन तासानंतर संपली आहे. त्यामुळे मोदी आणि ठाकरे भेटीनंतर ही पत्रकार परिषद मराठ समाजासाठी अतिशय महत्वाची आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच म्हटलं की ही भेट अधिकृत होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर जे विषय मांडले ते त्यांनी गांभीर्याने ऐकून घेतले. एकूणच ही बैठक सकारात्मक झाली असं मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीत मराठा, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण या विषयावर चर्चा झाली. तसेच, मेट्रो कारशेडच्या जागेबाबतही यावेळी चर्चा झाल्याचं ते म्हणाले आहेत.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :

  • ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करा – अशोक चव्हाण
  • मराठा आरक्षणाचा विषय आता केंद्राकडे
  • मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
  • पदोन्नती आरक्षणाचा मुद्दा फक्त राज्यापुरता मर्यादीत नाही
  • आरक्षण कायम ठेवण्यासाठी घटनादुरुस्ती करा
  • मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्य़ाची मोदींकडे केली विनंती
  • राज्याला जीएसटीचा २४ हजार ३०६ कोटींचा परतावा द्यावा – अजित पवार
  • पीक वीम्यासाठी बीड पॅटर्न राबवावा
  • दिल्लीत आलोय विषय सर्वांना माहिती आहे.
  • पंतप्रधानांनी राज्यातील सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले. आजची भेट अधिकृत होती. सकारात्मक चर्चा झाली
  • मराठा आरक्षण, ओबीसी पदोन्नती आरक्षण, मेट्रो कारशेड, जीएसटी परतावा, शेतकऱ्यांचा पीकविमा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली ही भेट सकारात्मक होती आणि लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वडीलांच्या अंत्यसंस्कारात मुली नाचतात तेंव्हा..

News Desk

जेव्हा ट्रम्प मोदीशर्ट घालतात

News Desk

मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर सर्वस्तरावरून टीकेचा वर्षाव

News Desk