HW News Marathi
देश / विदेश

MarathaReservation : २५ जानेवारीला मराठा आरक्षणावर पुढील सुनावणी होणार

नवी दिल्ली | मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी आज (९ डिसेंबर) सुप्रिम कोर्टात ५ न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे सुनावणी झाली. दरम्यान, अद्याप सुनावणी सुरु आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती तुर्तास हटवण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारच्या बाजूने मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला. २५ जानेवारीला मराठा आरक्षणावर पुढील सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणीपर्यंत नोकरभरतीला स्थगिती दिलेली कायम असणार आहे.

मराठा आरक्षण स्वतंत्र रितीनं दिले गेलं, ओबीसीतून मराठा समाजााला आरक्षण नाही, मुकुल रोहतगी यांचा जोरदार युक्तीवाद, आयोगाच्या शिफारशीनं आरक्षण मिळालं, मराठा आरक्षणाला हायकोर्टानं सरंक्षण दिलं होत, तामिळनाडू राज्यात 69 टक्के आरक्षण, राज्यातील मागास वर्गाला आरक्षण देण्याचा अधिकार, 50 टक्क्याची सील राज्याला विशेष परिस्थिती लागू होत नाही, असा मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला.

मराठा आरक्षणाला हायकोर्टाकडून संरक्षण, आयोगाच्या शिफारशीने आरक्षण मिळालं, 50 टक्के आरक्षणाची मर्यादा राज्याला विशेष परिस्थितीत लागू होत नाही, तामिळनाडू राज्यात 69 टक्के आरक्षण असल्याचा मुकुल रोहतगी यांचा सुप्रीम कोर्टात दाखला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीसीसीआयच्या दिल्ली कार्यालयाला कुलुप

News Desk

Union Budget 2021 | सोने आणि चांदी स्वस्त होणार

News Desk

अनिल अंबानींकडून काँग्रेस, नॅशनल हेरॉल्डविरुद्धचा मानहानीचा खटला मागे

News Desk