HW News Marathi
महाराष्ट्र

नाटक सुरु करण्यासाठी अडचण, कलाकार-दिग्दर्शक राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई | राज्यात हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्य सरकारने चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ६-७ महिन्यानंतर नाट्यगृहात तिसरी घंटा वाजली. मात्र, नाटक सुरु करताना काही अडचणी समोर येत असल्याची तक्रार कलाकारांकडून केली जात आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जागतिक मराठी नाट्यकर्मी संघाने भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आज राज ठाकरेंसमोर मांडल्या. या शिष्टमंडळात प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे या सगळ्यांची उपस्थिती होती. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही यावेळी उपस्थित होते. कोरोना आणि लॉकडाउन यामुळे नाट्य कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता या कलाकारांनी आज (१० नोव्हेंबर) राज ठाकरेंची भेट घेतली.

काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने नाट्यगृहं, सिनेमागृहं आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास संमती दिली आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेरची नाट्यगृहं, सिनेमागृहं आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास संमती देण्यात आली आहे. नाट्यगृह, सिनेमागृहं यांच्या एकूण आसन क्षमनतेच्या ५० टक्के आसनक्षमतेने प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. दरम्यान कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात मराठी कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता हळूहळू नाट्यगृहं सुरु होत असली तरीही अडचणी संपलेल्या नाहीत. आपल्या याच अडचणी मराठी कलाकारांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढे मांडल्या आहेत.

या आधी डबेवाले, ग्रंथालय चालक, जीम चालक, कोळी महिला यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्याकडे अडचणी मांडल्यानंतर काही समस्या या सुटल्या होत्या तर काही समस्या या सरकारकडे पोहोचवल्या गेल्या होत्या. त्यामुळे कलाकारांची नाटक सुरु करण्यासाठीची अडचण राज ठाकरे कशी दुर करणार का मार्ग सांगणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारसह अनिल देशमुखांना हायकोर्टाने दिला दणका; आव्हान याचिका फेटाळली

News Desk

रोज या सरकारचा बचाव करणं एवढचं काम पवारांकडे आहे! 

News Desk

‘BMC मध्ये मुंबईतील कर्मचाऱ्यांची कमाई लुटण्याचे काम’, भाजप आमदाराचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

Aprna