HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मराठी शाळांदेखील पाच दिवसांचा आठवडा करा अशी मागणी

मुंबई | ठाकरे सरकारने सत्तेत आल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि त्यातलाच महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवड्याला दिलेली परवानगी.  त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील शाळांनादेखील पाच दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी जनता शिक्षक महासंघाचे मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.

माध्यमिक शाळा संहितेनुसार मराठी शाळांना देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळांसारखा पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी केली आहे. पण, तरीही बहुतांश शाळा अजूनही सहा दिवस चालू असतात. शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या तासिका सोमवार ते शुक्रवार विभागता येऊ शकतात. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा शक्य असल्याचे अनिल बोरनारे यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील अनेक शाळा या दुपार अधिवेशनात भरतात. दोन्ही अधिवेशनातील शाळा १५ मिनिटे आधी आणि १५ मिनिटे उशिरा सोडून पाच दिवसांचा आठवडा करणे शाळांना सहज शक्य असल्याने शालेय शिक्षण विभागाने पाच दिवसांच्या आठवड्याचा विचार करावा असे ही बोरनारे यांचे मत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी प्रलंबित होती. राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

Related posts

उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेची तात्काळ मतमोजणीचे आदेश

News Desk

मलबार हिलचेही नामांतरण होणार ?

News Desk

सर्वाधिक वेळा संसदेत अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री कोण आहेत माहित आहे का?

rasika shinde