HW News Marathi
महाराष्ट्र

धमकीचा फोन आल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा लगेचच विश्वास नांगरे-पाटलांना फोन

मुंबई | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण जामनगरमधून बोलत असल्याचं सांगितलं. आपण लगेचच वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयात फोन करुन तक्रार दिल्याची माहिती पेडणेकरांनी दिली आहे. सुरक्षा वाढवण्या संदर्भात मला विचारलं होतं, पण महापालिकेची सुरक्षा असल्याचं किशोरी पेडणेकरांनी सांगितलं आहे.

“फोन करणारा मी जामनगरमधून बोलतोय, असं सतत बोलत होता. तीन-चार फोन आले, म्हणून मी उचलले. मी फोन स्पीकरवर ठेवला होता. फोन उचलल्यावर त्याने घाणेरड्या भाषेत बोलायला सुरुवात केली. अश्लील शिव्या दिल्या. जर पोलिसांना सांगितलंत, तर मारुन टाकेन, असं म्हणाला होता. मी लगेच विश्वास नांगरे पाटील यांच्या ऑफिसला फोन केला. त्यांनी दखल घेऊन लगेच पत्राद्वारे सगळी माहिती घेतली” अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

“मी त्याच रात्री ५ दिवसांसाठी बाहेर गेले होते आणि २५ डिसेंबरला मुंबईत आले. माझं, माझ्या पीएचं आणि तिथे उपस्थित असलेल्या विशाखा राऊत यांचं स्टेटमेंट घेतलं असून गुन्हा नोंदवला आहे. फोन करणाऱ्याने खंडणी वगैरे मागितलेली नाही. माझा नंबर कुठेही मिळू शकतो, पण माझ्याबरोबर असलेल्या पीएचा नंबर सगळीकडे असू शकत नाही” असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

“पोलिस आरोपीचा नक्की शोध घेतील, माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. नेमका हा कोण व्यक्ती आहे, हे मलाही बघायचं आहे. हे धाडस कोणाचं हेच पाहायचं आहे. जेव्हा तो समोर येईल, तेव्हा नक्कीच मी त्याला सांगेन. एकतर परिचितांपैकी कुणी फोन केला असावा किंवा माझ्याबद्दल खूपच वाईट मत असलेल्या एखाद्या व्यक्तीचा हात असावा किंवा धमकीमागे काहीतरी राजकीय विषय असावा, असा अंदाज व्यक्त केल्याचं पेडणेकरांनी सांगितलं आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शहरातील सर्वस्तरातील नागरिकांनी मेट्रो रेल्वेत प्रवासाची सवय लावून घ्यावी, पंतप्रधानांचे पुणेकरांना आवाहन

Aprna

३६ जिल्ह्यांना आमदार रोहित पवारांकडून मदतीचा हात

News Desk

वेतन पडताळणी पथक १८ ते २१ जुलै दरम्यान नांदेडच्या दौऱ्यावर 

News Desk