HW News Marathi
महाराष्ट्र

सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी घेतली शरद पवारांची भेट

सांगली | भाजपने लोकमताचा अनादर करीत काही राज्यांतील सत्ता हस्तगत केली, त्याला प्रत्युत्तर देण्याची सुरुवात सांगलीतून झाली. आता सर्वांना विश्वासात घेउन विकासाची कामे करा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (२७ फेब्रुवारी) दिला आहे.

सांगली महापालिकेत बहुमत असतानाही भाजप उमेदवारांचा पराभव करत काँग्रेसच्या मदतीने सत्तांतर घडवून आणल्यानंतर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासोबत काल पवार यांची बारामती येथे भेट घेतली.

या वेळी पवार यांनी सत्तांतरावेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडीची माहिती विचारून घेतली. महापौर निवडीवेळी किती सदस्यांनी आघाडीला मतदान केले, किती गैरहजर राहिले याची विचारणा देखील केली. आघाडीला मदत करणाऱ्यांनाही विकासकामे करीत असताना विश्वासात घ्या, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला आहे.

भाजपने ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांवर हल्ले करीत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले, त्यांना चोख प्रत्युत्तर सांगलीतून मिळाले असून ही सुरुवात आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे याही उपस्थित होत्या.

सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सत्तांतरावेळी घडलेल्या घडामोडीची माहिती दिली. या वेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे या उपस्थित होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मंदा म्हात्रेंच्या विधानावर आता चंद्रकांत पाटलांचं उत्तर! म्हणाले….’

News Desk

माजी पालकमंत्र्यांना उशिरा का होईना जाग आली ! धनंजय मुंडेंनी सुनावलं

News Desk

शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर, विरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवर टीका

News Desk