HW News Marathi
महाराष्ट्र

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची गिरीष महाजन यांनी केली चौकशी

अकोला ।  बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत (Paras accident) जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे भेट देऊन उपचार घेणाऱ्या जखमींची  आपुलकीने चौकशी केली.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन हे सोमवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी आले. त्यांचे समवेत आमदार वसंत खंडेलवाल, रणधीर सावरकर, हरिष पिंपळे आदी उपस्थित होते. या सर्व जखमींची महाजन यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांना दिल्या जात असलेल्या उपचार सुविधांची माहिती घेतली.

अकोला येथील रुग्णालय व्यवस्थापन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचे कामकाजात सुधारणा होण्यासाठी तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आपण लवकरच मंत्रालयात एक बैठक घेणार आहोत. त्यात हे प्रश्न सोडविण्याचा व जिल्ह्यातील आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक सुधारणा करण्याचा प्रयत्न करु. आरोग्य विभागातील वर्ग 3 व 4 ची पदे भरण्याची प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करु, असेही त्यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

मृतांच्या वारसांना शासनाच्या निकषाप्रमाणे  मदत देण्यात येईल याशिवाय जखमींना मदत व उपचार सुविधा शासनातर्फे पुरविण्यात येईल, असेही महाजन यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवापूर मध्ये शेकडो शिवसैनिक भाजपात सामील

News Desk

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

News Desk

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

News Desk