HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधींच्या निवासस्थानी बैठक

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी काँग्रेस नेते अहमद पटले, के. के. वेगुगोपाल, ए. के. अँटनी आदी नेते उपस्थिती असणार आहे. या बैठकीत राज्यात शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार असल्याचे म्हटले आहे.

“राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही,” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (१८ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत सांगितले. पवार पुढे म्हणाले की, आम्ही फक्त राज्यातील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून राहणार, असे ते म्हणाले. आज (१८ नोव्हेंबर) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल! – उपमुख्यमंत्री

Aprna

“आता राज्यातील सर्व गुन्ह्यांची उकल ‘NIA’ने करावी का?”; भाजपचा सरकारला सवाल

News Desk

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का!

News Desk