HW News Marathi
महाराष्ट्र

#Gopinathgadh : गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्ताने मेळावा, पंकजा मुंडे काय बोलणार याकडे लक्ष

बीड। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने आज (१२ डिसेंबर) बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे नेतृत्व गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी करणार आहेत. या निमित्ताने त्यांनी मुंडेंच्या समर्थकांना संबोधित करताना पंकजा मुंडे नेमकी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. या पार्श्वभूमीवर मनातील नाराजी आणि खदखद व्यक्त करणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या काही तासांत मिळणार आहेत. पंकजा मुंडे दुपारी एक वाजता संबोधित करतील.

पंकजा मुंडेंसह त्यांच्या भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, राज पुरोहित, सुरेश धस, रासप अध्यक्ष आणि पंकजा मुंडे

यांचे मानलेले भाऊ महादेव जानकरही गोपीनाथ गडावर हजेरी लावणार आहेत. पंकजा मुंडे, रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षांतर्ग लोकांनी घडवून आणण्यात आला, असा आरोप एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. आपण आरोपांचे पुरावे देऊ ,असे आव्हाव खडसेंना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. या संपूर्ण आरोप प्रत्यारोपांवर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी भाष्य केले. यावेळी त्यांनी अतिशय सूचक विधाने करत पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्त्वावर टीका केली.

पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट राजकीय चर्चा

पंकजा मुंडेंच्या सूचक फेसबुक पोस्टनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच प्रश्नाची चर्चा आहे. ती म्हणजे १२ तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे कोणती घोषणा करणार? अशातच, भाजपमध्ये नाराज असल्यांची ज्यांची चर्चा असणाऱ्या खडसे, तावडेंनी पंकजा मुडेंना भेटण्याचे सत्र सुरु केले. त्यामुळे ही मंडळी भाजपला धक्का देऊन वेगळा गट निर्माण करणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र पंकजा मुंडेंनी बंडखोरी करणार नसल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला. तरी देखील पंकजा मुंडे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मी घरी बसणार, मी कोरोनाला हरवणार’,आरोग्यमंत्र्यांचा विश्वास

swarit

BMC मधील प्रभाग रचनेतील बदललेल्या नकाशाबाबत भाजप नेत्याचा आक्षेप

Aprna

किरीट सोमय्यांचं थेट साताऱ्यात जाऊन अजित पवारांना आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर….

News Desk