HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाची लाट ओसरताच शिवसेनेत मेगा भरती; कुठल्या पक्षाला लागणार गळती?

वर्धा | राज्यातील प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पक्षाला बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशात शिवसेनेत मेगाभरती होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेत इतर पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी भरती होणार असल्याचा दावा युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांनी केला आहे. कोरोनाची लाट ओसरताच शिवसेनेत मेगा भरती होताना दिसेल, असं वक्तव्य वरुण सरदेसाई यांनी वर्धा येथे केलं आहे.

कोरोनाची लाट ओसरताना शिवसेनेत मेगा भरती होताना दिसेल. अन्य पक्षातील अनेक चांगले पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छूक आहेत. स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांशी तसेच संपर्क प्रमुखांशी चर्चा झाल्यानंतर येत्या काळात जशी कोरोनाची लाट ओसरताना दिसेल तशी शिवसेनेत मेगा भरती होताना दिसेल. प्रत्येक राजकीय पक्षातील चांगल्या कार्यकर्त्याना शिवसेनेत यायचे आहे असे वक्तव्य वरुण सरदेसाईंनी केले आहे.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात काम करण्यास अनेक पक्षातील नेते, कार्यकर्ते उत्साही आहेत. चांगले कार्यकर्ते, चांगल्या नेत्यांना प्रवेश देऊन संधी देण्यात येईल, त्याबद्दलचे निर्णय शिवसेनचे नेते घेतील. आदित्य शिरोडकर शिवसेनेत आले आहेत. त्यांच्यासोबतच चांगले पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत सामील होतील. युवा सेनेचे पदाधिकरी असले तरी निष्ठावान कार्यकर्ते असतात.

चांगले काम करत असेल तर कार्यकर्त्यांची दखल घेत योग्य उमेदवारी देतील असंही वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. इतर पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छूक असल्याचं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कुठल्या पक्षाला गळती लागणार आणि कुठल्या पक्षातील नेते, पदाधिकारी शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छूक आहेत याबाबत चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय एक परिपूर्ण संकुल ठरेल! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

सरकारने शासकीय दिनदर्शिकेतून मराठी महिनेच काढून टाकले, या मागील बोलविते धनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आहेत काय?  

News Desk

Maratha Reservation | मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणार

News Desk