HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊनमध्ये मेट्रो, मान्सूनपूर्व कामे, ज्येष्ठांना मदतसह पीठ गिरणींना सूट

मुंबई | राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमधून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे कर्मचारी व काळजीवाहक, पिठाची गिरणी, मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरपालिका आयुक्तांनी मंजुरी दिलेल्या मेट्रो रेल्वेची कामे व इतर मान्सूनपूर्व कामांना सूट देण्याचा आदेश राज्य शासनाने काल (२३ एप्रिल) काढला आहे.

राज्य शासनाने आज जारी केलेल्या आदेशात काही सेवांना सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये पॅक हाऊस, बियाणे व फलोत्पादनाच्या तपासणी व उपचार सुविधांची आयात निर्यात, शेती व बागायतीशी संबंधित संशोधन संस्था, वृक्ष लागवड व मधमाशी वसाहती, मध व त्यासंबंधीच्या उत्पादनांची राज्याअंतर्गत व आंतरराज्यीय वाहतूक, ब्रेड फॅक्टरी, दूध प्रक्रिया प्रकल्प, डाळ मिल, पंख्यांची दुकाने यांचा समावेश आहे. त्याशिवाय वन विभागाच्या कार्यालयासह वनीकरण, वृक्षारोपण व त्यासंबंधित कामांनाही लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे.

तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मानकानुसार (एसओपी) भारतीय बंदरांमधील समुद्री जहाजांना आवक-जावक व त्यांच्या हालचालींना परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनमधून सूट दिली असली तरी ही कामे करताना शासनाने घोषित केलेले नियम, सामाजिक अंतर व स्वच्छता यांची काळजी संबंधित आस्थापनांनी घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर कोव्हॅक्सिन लस टोचून घेऊ नका, भारत बायोटेकने दिला गंभीर इशारा

News Desk

महाराष्ट्रासाठी पुढील ८ दिवस महत्वाचे, राजेंद्र शिंगणेंनी व्यक्त केली चिंता

News Desk

संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड केंद्राचे काम तातडीने पूर्ण करा -अजित पवार

News Desk