HW News Marathi
देश / विदेश

एमएचटी सीईटी परिक्षेच्या विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासाविषयी संभ्रम कायम?

मुंबई | राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने रेल्वे प्रशासनाला 8 सप्टेंबर रोजी परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास देण्यात याव असं पत्र देण्यात आलेलं आहे. परंतु हे पत्र अद्यापही रेल्वे प्रशासनाला मिळालेल्या नाही अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे. या परीक्षांचा निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2021-22 नोव्हेंबरपासून सुरु होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल.

रेल्वेने प्रवास करण्यात येणार का हा संभ्रम

राज्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर पर्यंत बारावी नंतरच्या व्यावसायिक शिक्षणासाठी सीईटीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. आज एमसीए आणि हॉटेल मॅनेजमेंट या दोन व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी सीईटीची परीक्षा घेण्यात येत आहेत. परंतु, या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान लोकल रेल्वेने प्रवास करण्यात येणार का हा संभ्रम आहे. राज्य सरकारकडून रेल्वेला पत्र पाठवलंय, असं सांगण्यात आलं आहे. तर, रेल्वे प्रशासनाकडून अद्याप पत्र प्राप्त झालं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यावादात विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली आहे.

सीईटी परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे

मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लीकेशन, मास्टर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्टस, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन या परीक्षा 15 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहेत.

मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, मास्टर ऑफ बिजनेस ॲडमिनीस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडी या परीक्षा दि. 16 ,17 व 18 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहेत.

बॅचलर ऑफ इंजिनिअरींग/टेक्नॉलाजी (B.E/B.TECH), बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharm/Pharm.D), ॲग्रीकल्चर अँड ॲलाईड कोर्स या परीक्षा दि. 20 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021या दरम्यान होणार आहेत.

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन अँड मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ लॉ (5 वर्ष),बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षा दि. 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत.

बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन दि.4,5,6 आणि 7 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत. तसेच बॅचलर ऑफ लॉ-(3 वर्ष ) 4 व 5 ऑक्टोबर 2021,

बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल, या परीक्षा दि. 6 व 7 ऑक्टोबर 2021रोजी होणार आहेत.

बॅचलर ऑफ फाईन आर्ट दि. 9 व 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी कायद्यांचं भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयात! समितीने बंद लिफाफ्यात अहवाल केला सादर

News Desk

भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार बदलावा | केजरीवाल

swarit

मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna