HW News Marathi
महाराष्ट्र

मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद कायम ?

मुंबई । काँग्रेसने महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा तोडगा निघाला असला तरी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षावर मात्र अद्याप तोडगा निघाला नाही. मुंबई काँग्रेसला अध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार सापडला नाही. काँग्रेस लवकरच मुंबई काँग्रेस अध्यक्षबरोबरच उपाध्यक्षाची देखील नेमणूक करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यात मिलिंद देवरा पुन्हा मुंबई काँग्रेस अध्यक्ष विराजमान होणार असल्याचे म्हटले जाते. तर एकनाथ गायकवाड आणि हुसेन दलवाई यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने एकनाथ गायकवाड यांना दलित चेहरा म्हणून तर हुसेन दलवाई यांना मुस्लिम चेहरा असे समीकरण या निवडी पाठीमागे असल्याचे राजकीय वर्तुळात बोले जात आहे. यासंबंधीत दोन दिवसात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेस रणनिती समिती अध्यक्ष, पृथ्वीराज चव्हाण जाहिरनामा समिती अध्यक्ष, सुशील कुमार शिंदे समन्वय समिती अध्यक्ष, रत्नाकर महाजन यांना प्रसिध्दी आणि प्रकाशन समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Shetty HW Exclusive : १५ दिवसांनी भाजीपाल्याची टंचाई होईल !

News Desk

पुनम महाजन आजकाल कुठे आहेत; संजय राऊतांचा सवाल

Aprna

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात

News Desk