पुणे | गोरक्षक म्हणून गोशाळा चालविण्याच्या पद्धतीवरून झालेल्या वादातून समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे व त्यांच्या साथीदारांना गोरक्षकांकडून मारहाण करण्यात आली आहे. ही घटना पुरदंर तालुक्यातील झेंडेवाडी येथे काल (७ मे) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारस घडली आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी फिर्याद म्हणून तकार केली असून या प्रकरणी पोलिसांनी ४० ते ४५ जणांविरोधात दंगल घडवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पुूरंदर तालुक्यातील मौजे झेंडेवाडी येथील ज्वाला मंदिरात मिलिंद एकबोटे हे कार्यकर्त्यांसह देवदर्शन व प्रवचनासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम संपल्यानंतर ते जवळच असलेल्या शनि मंदिरासमोर जेवणासाठी बसले असताना तेथे पंडित मोडक, विवेक मोडक, निखिल दरेकर हे ४० ते ५० लोकांचा जमावासह आले. पंडित मोडक यांनी एकबोटे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत सासवड मध्ये राहायचे नाही अशी धमकी दिली.
यावेळी एकबोटे यांच्यासह आलेल्या कार्यकर्त्यांची वडकीतील तरूणांशी वाद झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यामध्ये एकबोटे यांच्याबरोबर आलेले अभिषेक वाघमोडे आणि प्रतीक गायकवाड हे दोघे जखमी झाले आहेत. याबाबत मिलिंद एकबोटे यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये रात्री १.३० वा फिर्याद दाखल केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.