HW News Marathi
महाराष्ट्र

मिलिंद एकबोटेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. एकबोटेंनी राज ठाकरेंच्या यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास दहा ते पंधरा मिनिटे चर्चा झाली. या दोघांच्या भेटीने राज्याचा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पुण्याच्या वढू बुद्रूक येथे २४ मार्चला एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुण्यतिथीनिमित्त राज ठाकरेंनी संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी यावे. आणि उपस्थित राहणाऱ्या सर्व शंभू भक्तांना मार्गदर्शन करावं, अशी विनंती करण्यासाठी मी आलो होतो”, असे मिलिंद एकबोटे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मिलिंद एकबोटे यांचे नाव कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर प्रचंड चर्चेत आले होते. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर पुण्यात दंगल भडकावणे आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. एकबोटे यांच्यावर कोरेगाव भीमा हिंसाचाराअगोदरही दंगल भडकवणे, अतिक्रमण करणे असे तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून घेण्यात आला –  फडणवीस

News Desk

“मी सेटलमेंट केली तर महाराष्ट्राचे डीजीपी माझ्या विरोधातील…” परमबीर सिंगांचा आरोप

News Desk

ओबीसी राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक होणार, निवडणूक आयोगाचं राज्य शासनाला पत्र

News Desk