HW Marathi
महाराष्ट्र

राज्यात लवकरच दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

मुंबई | प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीला नुकतेच एक वर्षपूर्ण झाले आहेत. आता दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर एका महिन्यात बंदी लागू होईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज (२७ जून) विधानसभेत दिली आहे. दूध विक्रेत्यांकडे दूध पिशवी घेताना ५० पैसे डिपॉझिट ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी दूध पिशवी रिकामी झालेली परत करावी, ती स्वीकारून त्या दूध पिशवीची ५० पैसे रक्कम रोज परत केली जाईल, अशी योजना एक महिन्याच्या आत आमलात आणली जाणार आहे, अशी माहितीही कदम यांनी यावेळी सभागृहात दिली.

राज्यात दिवसाला २३,७०२ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्यातील १२,५४८ मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, त्यापुढे त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करून शेतकऱ्यांना कमी दरात विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती कदम यांनी विधानसभेत दिली.

गेल्या वर्षभरात राज्यात राज्यात १ लाख २० हजार २८६ टन प्लॅस्टिक जप्त केले करण्यात आले असून २४ कंपन्या दिवसाला ५५० टन प्लॅस्टिकवर प्रक्रिया करतात. तर सिमेंट कंपन्यांना ३००० हजार टन प्लॅस्टिक वापरायला दिले असल्याचे कदम यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार परराज्यातून येणारे प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक घेऊन येतात. रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक राज्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

Related posts

विरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात !

News Desk

सोशल मिडियावरही बाप्पा मोरया!

News Desk

नांदेड जिल्ह्यात ६९.६१ टक्के मतदान

News Desk