HW News Marathi
महाराष्ट्र

संकट कमी होऊन दुधाला भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेने ठेवले दुधात

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा अशी मागणी छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी केली आहे. छावा संघटनेने दुध आंदोलनात सहभागी होत दुध दरवाढ आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

” शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत, दुधाला भाव नाही. बिसलेरी पाणी बाटली २० रूपये लिटर तर दुध शेतकऱ्यांकडून १६- १७ रू. ने खरेदी केले जात आहे. जनावरांचे संगोपन खाद्य व मेहनत पाहता हा अन्याय आहे. मुख्यमंत्री महोदय मायबाप आता यातुन मार्ग काढा शेतकरी बांधवांना ५ ते १० रूपये अनुदान प्रत्येक शेतकरी बांधवांच्या थेट खात्यात जमा करावेत म्हणुन तुम्हांला आज मी दुधात ठेवून हि मागणी करत आहे”,

छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री यांना विडीओ द्वारे ट्वीट केले आहे. शेतकरी बांधवांचे प्रश्न मार्गी लावा. अशी आर्त हाक त्यानी मारली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेते गिरीश महाजन यांना धमकीचे बॉम्बने उडवून देण्याची धमकी

News Desk

राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमॅजिलो नवा व्हायरस, राजेश टोपे स्वत: पुण्याला जाणार!

News Desk

भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार

News Desk