HW News Marathi
Covid-19

चंद्रकांत पाटलांना मानसिक उपचारांची नितांत गरज ! अशोक चव्हाणांनी सुनावलं

मुंबई । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. “अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं”, असा टोकाचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. याच टीकेला आता अशोक चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या ‘फुलप्रुफ’तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते सतत बेताल विधाने करीत असून, त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज आहे”, असा सणसणीत टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

मराठा आरक्षण प्रकरणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले की, “भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आलेली होती. वरून मराठा आरक्षणाबाबत भाजपने केलेल्या खोट्या दाव्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केल्याने आ. चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. या प्रचंड ताणतणावामुळे नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे”, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?

मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, “अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: च्या राज्यासाठी काहीतरी करून दाखवावे. अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करायचं ते त्यांनी आम्हाला सांगू नये”, असा इशारा देताना चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात २८ जूनपासून सलून-पार्लर्स सुरु होणार, ‘हे’ नियम बंधनकारक

News Desk

राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वरील २ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

News Desk

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

News Desk