बीड । राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे आपलं लक्ष्मीपूजन परळी शहरातील व्यापारी व विविध व्यवसायिकांसमवेत साजरं केलं आहे. धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील संपूर्ण बाजारपेठेत पायी फिरून प्रत्येक लहान-मोठ्या दुकानात जाऊन सर्व व्यावसायिक व व्यापारी बांधवांना दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या. गेल्या अनेक वर्षांपासून धनंजय मुंडे आपली दिवाळी अशीच साजरी करतात.
परळी शहरातील मोंढा, कापड लाईन, सोनार लाईन आदी संपूर्ण बाजारपेठ धनंजय मुंडे यांनी पायी फिरून कापड दुकान, आडत, किराणा, कृषी निविष्ठा, सुवर्णकार, खाजगी डॉक्टर्स यांसह विविध व्यावसायिक व व्यापारी बांधवांना शुभेच्छा दिल्या. मंत्री धनंजय मुंडेंनी कायम पाय जमिनीवर ठेऊन इथल्या नागरिकांशी नातं जपलं असल्याच्या भावना अनेक व्यापाऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह यावेळी जि. प. गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा. कॉ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी, बाजरी समितीचे सभापती ऍड. गोविंद फड, जि. प. सदस्य प्रा.मधुकरराव आघाव, पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, नगरसेवक दिपक देशमुख यांसह महाविकासआघाडीचे विविध पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत भेटीगाठी व शुभेच्छांचं सत्र सुरूच होतं
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.