HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकार मराठा आरक्षण मिळवून देईल ,जबाबदारी घ्यायला तयार ! मुश्रीफांचं मोठ विधान

गडहिंग्लज | मराठा आरक्षणासाठी आता खासदार संभाजीराजे एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांच्या याच भूमिकेचं कौतुक ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. खासदार संभाजीराजेंचे नेतृत्व संयमी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लढा नक्की यशस्वी होईल.

महाविकास आघाडीचे सरकारचं मराठा आरक्षण मिळवून देईल, त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी जबाबदारी अंगावर पडेल, ती पेलण्याची आपली तयारी आहे. विरोधक केवळ आंदोलनाच्या आडून राजकारण करण्याच्या तयारी असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ते गडहिंग्लज येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर भूमिका मांडली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. ५० टक्के आरक्षण शिथिल करावं अशी मागणीही यावेळी मोदींकडे करण्यात आली. दरम्यान, राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सर्वोतोपरी काम करत आहे. केंद्राकडे या विषय गेल्याने यावर आता काही ठोस तोडगा निघेल का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे.

ते पुढे असंही म्हणाले की, मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांनी आपल्याला भेटून निवेदन दिले आहे. आरक्षण मिळालेच पाहिजे, ही भूमिका आपलीही आहे. यासाठी नेमलेल्या समितीने फेरविचार याचिकेबाबत पर्याय दिला असून, यादृष्टीनेही राज्य सरकारची तयारी सुरु आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्धच असून, खा. संभाजीराजेंचे नेतृत्व असल्याने सध्याच्या कोरोना काळात काय करावे, याचे भान त्यांना आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला नक्की यश येईल.

चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंवर केलेल्या टीकेबाबत मुश्रीफ म्हणाले, संभाजीराजेंना महाविकास आघाडीवर विश्वास आहे. ही आघाडीच मराठा समाजाला आरक्षण देईल. सध्या कोरोनाची परिस्थिती त्यांना माहीत आहे. त्यामुळे मोठे मोर्चे, आंदोलन करुन आपल्याच समाजातील लोकांना महामारीत ढकलणे परवडणारे नाही. संयमी नेतृत्व या लढ्याला नक्की यश मिळवून देईल. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यावर मुश्रीफांना काही पलटवार करतात का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांचे निकटवर्तीय रविराज तावरेंवर गोळी झाडणारे सापडले, बारामतीत अल्पवयीन तरुणासह ४ जणांना अटक

News Desk

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात आता फरकच उरलेला नाही नितेश राणे यांची टीका!

News Desk

“मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे”-नाना पाटेकर

News Desk