HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यावर राणा दांपत्याविरोधात निवडणूक लढवतो!- अब्दुल सत्तार

बीड | आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वाद सुरू आहे. नवनीत राणांना लिलावती रुग्णालयातून आल्यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढवावी, आणि त्यांनी विरोधात मी निवडणूक लढवणार, असे त्यांनी आव्हान केले आहे. त्यावर राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या आव्हानावर ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी नवनीत राणा यांच्याविरोधात अमरावतीत जावून शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. 

सत्तारांनी बीडमध्ये आयोजित प्रा.सुरेश नवले मित्र मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी सत्तार माध्यमांशी बोलत होते. सत्तार म्हणाले, “एक लक्षत घ्या, जे राणा चाराण्यासारखी गोष्ट बोलू लागले. त्या चाराण्या वाल्याना इतक्या मोठ्या डोंगरासमोर आव्हान करण, हे तुम्हाला मला आणि महाराष्ट्राच्या जनतेला, या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी यांनी, ज्या ज्या वेळेस जे जे सांगितले ते ते आपण पाहतोय. देशात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून यांचा नाव आहे. कोणाला तरी कुठेतरी बोलण्यासाठी माइक पाहिजे, काहीतरी विषय पाहिजे, म्हणून ते विषय सोडतात..मात्र मुख्यमंत्री उद्धव साहेब यांनी, मला जर अमरावती मध्ये जाऊन निवडणूक लढण्याचे आदेश दिला, तर राणा विरोधात मी शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवेल. ” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कँन्सर जनजागृती साठी मँरेथॉन दौड

News Desk

“यात्रा, जत्रा कधी सुरू होणार?” अमित देशमुखांचं विधान!

News Desk

रिफायनरीविरोधात नाणारवासीय आक्रमक, आझाद मैदानात धरणे आंदोलन

News Desk