HW News Marathi
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण दडपण्याचा आरोप, डीसीपी कार्यालयावर मोर्चा

उल्हासनगर (गौतम वाघ):

उल्हासनगर येथील शांतीनगर परिसरातील अल्पवयीन मुलीवर झालेले अत्याचार प्रकरणी आरोपीवर सुधारित ऍट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई व्हावी व पीडित मुलीला पोलीस संरक्षण मिळावे आणि योग्य दिशेने तपास व्हावा या मागणीसाठी पीडित मुलीचे नातेवाईक व स्थानिक रहिवाश्यांनी डीसीपी कार्यालयावर आज क्रोध मोर्चा काढला यात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होते .

25 सप्टेंबर 2017 रोजी शांतीनगर परिसरात दुपारच्या सुमारास आरोपी रुपेश बांद्रे ( 26 ) या आरोपीने शेजारी राहणाऱ्या 9 वर्षीय मुलीला टीव्ही वरील कार्यक्रम दाखविण्याच्या बहाण्याने घरात बोलावले . सदर मुलगी घरात आली असता बांद्रे याने तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध ऍट्रोसिटी( अनुसुचित जाती -जमाती अधिनियम व पोक्सो ( प्रोटेक्शन ऑफ चिलड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता . सध्या आरोपी कारागृहात आहे .

या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी सरकारी खर्चात पोलीस संरक्षण मागितले होते मात्र अद्याप देखील त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण देण्यात आलेले नाही , या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त विकास तोटावार यांच्याकडे देण्यात आला आहे मात्र त्यांनी आरोपीवर जुन्या ऍट्रोसिटी अन्वये गुन्हा दाखल केला आहे , हा गुन्हा सुधारित कायद्याअनव्ये गुन्हा

दाखल करावा , अशी मागणी केली आहे , तोटावार यांनी योग्य तो अहवाल समाज कल्याण विभाग व जिल्ह्यधिकरी यांच्याकडे न पाठविल्यामुळे पीडित मुलीला योग्य ते आर्थिक साहय्य व पुनर्वसन करण्यास अडथळा होत आहे असा आरोप भन्ते गौतमरत्न व भिख्खू संघ रिपब्लिकन नेते श्याम गायकवाड, ऍड आशिष इंगळे ऍड अमित कटारनवरे ऍड सतीश बनसोडे,आणि मोर्चात सामील झालेल्या नागरिकांनी केला .

मोर्चा मध्ये महिला व बौद्ध धर्मगुरूंची संख्या लक्षणीय होती , मोर्चाचे गांभीर्य लक्षात घेवून आज सुट्टीचा दिवस असून देखील डीसीपी अंकित गोयल हे कार्यालयात मोर्चाला संबोधित करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी पीडित व तिच्या कुटुंबियाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन गोयल यांनी दिले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी मला पक्षात घेतले नसते तर मी बाद झालो असतो –  एकनाथ खडसे

News Desk

देशाचे चौदावे राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान सुरू छगन भुजबळ जेलबाहेर

News Desk

बारामती तालुक्यातील ६ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या ३१६ कोटी ८७ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता

Aprna