HW News Marathi
महाराष्ट्र

मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढणार !

मुंबई | ठाकरे सरकार लवकरच मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. मलिक यांनी केलेल्या घोषणेनुसार मुस्लिमांना शिक्षण आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची तरतूद करणारा अध्यादेश लवकरच काढला जाणार असल्याचे आज (२८ फेब्रुवारी) विधानपरिषदेत घोषणा केली.

विधान परिषदेत विरोधकांनी आज (२८ फेब्रुवारी) सत्ताधाऱ्यांना मुस्लीम आरक्षणावरुन ठाकरे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. तर, मुस्लीम आरक्षणाबाबत निर्णय कधी घेणार, असा प्रश्न शरद रणपिसे यांनी ठाकरे सरकारला विचारला होता. विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना मलिक म्हणाले की,” २०१४ ला जसा अध्यादेश होता, तसाच अध्यादेश काढून त्याचे कायद्यात रूपांतर करू, असे प्रत्युत्तर दिले. मुस्लीम आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने जे मान्य केले आहे. ते लक्षात घेऊन राज्यात लवकरात लवकर मुस्लीम आरक्षण देण्याबाबत कायदा करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढणार असल्याची माहितीनवाब मलिक यांनी विधान परिषदेत दिली. मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण लागू व्हावे. यासाठी लवकरात लवकर कायदा तयार करून आरक्षण लागू करण्याबाबत महाराष्ट्र विकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्या अगोदर मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, हा सरकारचा प्रयत्न असल्याचे माहिती मलिकांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यात रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेची ‘अबोली रिक्षा’

swarit

शिवसेना म्हणजे कन्फ्यूज पक्ष, शिवसेनेने आधी भूमिका ठरवावी- फडणवीसांचा खोचक सल्ला

News Desk

प्रताप सरनाईकांशी संबंधित NSEL प्रकरणी ईडीला हायकोर्टाचा दणका!

News Desk