HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र

ताडोबा अभयारण्यातील मीरा वाघिणीचा ‘या’ कारणामुळे मृत्यू

चंद्रपूर | ताडोबा अभयारण्यातील प्रसिद्ध माया वाघिणीचा बछडा असलेल्या मीरा वाघिणीचा मृत्यू झाला आहे. मीरा वाघिणीच्या मृत्यू आज (७ ऑक्टोबर) सकाळी अभयारण्यातील एका तलावाजवळ तिचा मृतदेह आढळून आला होता. मीराच्या मृतदेहावर शिंग लागल्याच्या खुणा झाल्या आहेत. मीराची प्राण्यासोबत झुंज करताना तिचा  मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मीरा या दोन वर्षाच्या वाघिणींच्या मृत्यूची बातमी मिळातच पर्यावरण प्रेमिणी हळहळ व्यक्त केली आहे. मीराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि मीराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच मीराच्या शरीरावर शिंग लागल्याच्या खुणा दिसून आल्यामुळे एखाद्या रानगव्याशी झुंज करताना शिंग लागल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज ताडोबा व्यवस्थापनाने व्यक्त केला जात आहे.

गेल्या वर्षभरात माया वाघिणीने पर्यटकांना चांगलेच आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली होती. अवघ्या काही दिवसांतच तिची क्रेझ बघून ताडोबा अभयारण्यात तिची प्रतिकृती बसवण्यात आली आहे. या माया वाघिणीचा बछडा असलेल्या मीराचा आज मृत्यू झाला. मीरा अवघ्या दोन वर्षांचीच असल्याने शिकारीचे तंत्र ती पूर्णपणे शिकलेली नसावी. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.

 

 

Related posts

नोटाबंदीला विरोध करणारे काळ्या पैशाचे पुढारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

News Desk

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणी तिघांना २० वर्ष सक्त मजूरीची शिक्षा

News Desk

खंडाळ्याजवळ मालगाडीचे डबे घसरले, मध्य रेल्वे ठप्प VIDEO

News Desk