HW News Marathi
महाराष्ट्र

मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे ‘कोरोना रुग्णालया’त रुपांतर !

मुंबई | सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे २४ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. इस्लामपूर येथे अचानकपणे वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात येताच मुंबईतील जे.जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे तातडीने ३०० खाटांच्या कोरोना रुग्णालयात रुपांतर केले आहे.

मिरज येथील कोरोना रुग्णालयात १५ आय.सी.यू . बेड, सिटी स्कॅन एम.आर.आय. या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोरोना तपासणीसाठी येत्या ३ ते ४ दिवसांत तपासणी केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. “मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्व रेसिडेंट डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ. वाहन चालक व अन्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम आजपासून (२९ मार्च) सुरू करण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल येईल” अशीही माहिती यावेळी अमित देशमुख यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेव्हा वचन दिलेत तेव्हा पासून ५०० चौ. फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करा!

Aprna

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा

News Desk

भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? – जयंत पाटील

Aprna