नवी दिल्ली | काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्त्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी लवकरच अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (२४ ऑगस्ट) सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या नव्या अध्यक्षासंदर्भात काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु आहेत. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केल्याचे वृत्त आहे. “तुम्ही भाजपसोबत काम करत आहात”, असे विधान राहुल गांधींनी या चर्चेदरम्यान काँग्रेस नेत्यांना उद्देशून केले आहे. राहुल गांधींच्या या विधानाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती. मात्र, राहुल गांधींशी बोलणं झाल्यानंतर सिब्बल यांनी आपले हे ट्विट डिलीट केले आहे.
कपिल सिब्बल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “राहुल गांधी म्हणतात कि आम्ही भाजपसोबत काम करत आहोत. राजस्थान उच्च न्यायालयात काँग्रेसची बाजू मांडण्यात आम्ही यशस्वी झालो. मणिपूरमध्ये भाजपने सत्तेतून पाय उतार व्हावे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. गेल्या ३० वर्षांत एकदाही आम्ही कोणत्याही विषयावर भाजपच्या समर्थनार्थ एकही भूमिका घेतलेली नाही. तरीही आम्ही भाजपसोबत मिळून काम करत आहोत”, असे उपहासात्मक ट्विट करत कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींच्या आरोपांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर सिब्बल यांनी आपले हे ट्विट डिलीट केले आहे. “राहुल गांधींशी वैयक्तिक बोलल्यानंतर त्यांनी असे कोणतेही विधान केले नसल्याचे लक्षात आल्याने मी माझे ट्विट डिलीट केले आहे”, असे स्पष्टीकरण सिब्बल यांनी दिले आहे.
Was informed by Rahul Gandhi personally that he never said what was attributed to him .
I therefore withdraw my tweet .
— Kapil Sibal (@KapilSibal) August 24, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.