HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार दानवेंची बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण, औरंगाबादेत तक्रार दाखल

औरंगाबाद। औरंगाबाद मधल्या प्रमुख चौक असलेल्या क्रांती चौकात सोमवारी (२८जूनला) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती आणि यामुळे संपूर्ण चौकातील चारही बाजूंनी चारचाकी, दुचाकी आणि मोठ्या वाहनांची मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी जवळच शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात असलेले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आपल्या काही कार्यकर्त्यांसह क्रांती चौकात तात्काळ पोहचले आणि त्यांनी मोर्चा हाती घेतला. तिथे उपस्थित असलेल्या ट्राफिक पोलिसाच्या मदतीनं आमदार दानवे यांनी क्रांती चौकातील वाहतूक कोंडी फोडली. यावेळी दानवे यांनी एका बेशिस्त रिक्षाचालकाला चांगलाच चोपही दिला होता.

आता या रिक्षाचालकाच्या तक्रारीनंतर आमदार अंबादास दानवेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रिक्षाचालकाला मारहाण केल्या प्रकरणी आमदार अंबादास दानवे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिक्षाचालक अजय जाधवकडून क्रांती चौक पोलीस ठाण्यात ही तक्रार आता दाखल करण्यात आली आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवतांना दानवे यांनी रिक्षाचालकाला मारहाण केली होती. औरंगाबादेतील क्रांती चौकात हा प्रकार घडला होता. आता यश रिक्षाचालकाने दानवे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू झाल्याने या निर्बंधांवरुन औरंगाबाद मधील नागरिकांमध्ये संभ्रमाच वातावरण पाहायला मिळाल. त्यामुळे दुपारी चार वाजेच्या आत घरी जाणाऱ्यांची धावपळ पाहायला मिळाली. एकाच वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्या उतरल्यामुळे शहरातील मुख्य चौक असलेल्या क्रांती चौकात वाहतूक कोंडी झाली. तिथे उपस्थित असलेल्या ट्राफिक पोलिसही हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. म्हणून शिवसेना कार्यालयात उपस्थित असलेले आमदार दानवे क्रांती चौकात दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत केली.

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांसह मी आणि शिवसैनिक प्रयत्न कलत होतो. त्यावेळी एक बेशिस्त रिक्षाचालक मध्येच घुसला. त्यामुळे त्याला शिस्त शिकवण्याचा प्रयत्न आपण केला. मी आमदार आहे, पण आधी मी एक शिवसैनिक आहे. त्या रिक्षाचालकाचा बेशिस्तपणा पाहून माझ्यातला शिवसैनिक जागा झाला होता, अशा शब्दात दानवे यांनी रिक्षाचालकाला फटकारल्याच पाहायला मिळालं. यासंदर्भातला व्हिडिओ आमदार दानवे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट देखील केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवजयंती निमित्त भारतात कोरोना योध्यांसह जिल्ह्यातील सर्व शिवस्मारकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार

News Desk

‘राज्यात भाजपचे सरकार यावे ही गणरायाची इच्छा, बाप्पा ती लवकरच पूर्ण करतील’; गिरीश महाजनांना विश्वास!

News Desk

‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’ , भाजपकडून मंदिरे सुरू करण्यासाठी आंदोलन

News Desk