HW News Marathi
महाराष्ट्र

“मेणबत्ती मोर्चे आणि ट्विटर ट्रेंड नको, आता…”, मनसे साकीनाका प्रकरणावर संतापली

मुंबई। महाराष्ट्राला संपूर्णपणे हादरवून टाकणारी घटना काल(११ सप्टेंबर) घडली. साकीनाक्या परिसरामध्ये एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवला गेला होता. त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण हादरून गेला आहे, तसंच राजकारण्यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील संताप व्यक्त केला आहे. इतर राजकीय पक्षांबरोबर मनसेनंही संताप व्यक्त करत ‘आणखी किती निर्भया?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

आणखी किती निर्भया?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. आणखी किती निर्भया? असं म्हणत मनसेनं नराधमांना फासावर लटकावण्याची मागणी केली आहे. मनसेने संताप यक्त करत शासनाला प्रश्न केला आहे. ‘आणखी किती निर्भया? मुंबईतील साकीनाका येथील पाशवी बलात्काराची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आता मेणबत्ती मोर्चे आणि ट्विटर ट्रेंड नको. नराधमांना फासावर लटकवा’, अशी मागणी मनसेनं केली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईला हादरवून सोडणारी घटना काल (११ सप्टेंबर) साकीनाक्या परिसरात घडली आहे. एका ३६ वर्षीय महिलेवर एका इसमाने बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवला होता. त्या पीडितेवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार चालू होते, मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. अनेक राजकीय नेते संताप व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टवर चालवायचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणात अधिक माहिती दिली आहे. हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

जखमी महिलेला पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर आरोपीविरोधात 307, 376 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मोहन या आरोपीला संशयावरुन ताब्यात घेतलं आहे. तो जोनपूरचा रहिवासी आहे. या आरोपीच्या अंगावर रक्ताचे डाग होते. न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढील एक महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू, असा दावाही मुंबई पोलिस आयुक्तांनी केला आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या आमदारांशी बातचीत केल्यानंतर मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या आमदारांना भेटणार!

News Desk

रामदास आठवले आता अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांचे संरक्षण करणार!

News Desk

राज्यपालांचा सरकारी विमानातून गोव्याचा प्रवास,राज्यपाल आणि ठाकरे सरकारमधील ‘तो’ वाद निवळला?

News Desk