HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसे स्वबळावरच लढणार!

नाशिक | एकीकडे भाजप आणि मनसेची भविष्यकाळात युती होणार अशी चर्चा सुरु आहे. याच चर्चेला कुठेतरी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी भाष्य केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्यानंतर मनसे-भाजप युती होणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्याला पूर्णविराम मिळाला आहे. नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

संदीप देशपांडे आणि मनसे नेते अमित ठाकरे हे आज (२८ जुलै) नाशिकच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये यावेळी संदीप देशपांडेंनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे नाशिकमध्ये कमबॅक करेल. गेल्या पाच वर्षात नाशिककरांची पुरती निराशा झाली आहे. दत्तक घेऊ ही योजनाही फेल गेली आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी भाजपला लगावला आहे.

युतीचा कोणताच प्रस्ताव नाही

नाशिकमध्ये मनसे स्वबळावरच लढणार आहे. सध्या तरी आमच्याकडे कुणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी नाशिकचं मनापासून संगोपन केलं आहे. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा संगम घडवून पुन्हा एकदा आम्ही नाशिकमध्ये कमबॅक करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे.

मदतीआधीच शिवसेनेची जाहिरात

शिवसेनेने मदत करण्याआधीच जाहिरात केली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कोकणाला फटका बसला आहे. मदत करण्यासाठी आपल्याकडे काहीच एसओपी नाही. हे प्रशासनाचं अपयश आहे. प्रशासन कोणत्याही प्रकारचे धोक्याचे इशारे लोकांना देत नाही, असं ते म्हणाले आहेत. निष्क्रिय लोकांच्या हाती सत्ता असल्यानेच कोणतंही नियोजन नाही. व्हिजन नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नद्यांवर भिंत बाधणार असल्याचं सांगितलं. म्हणजे पैसे खाण्याचा हा नवा मार्गच आहे, असं सांगतानाच आम्ही ब्लू प्रिंट तयार करणार असल्यांचही ते म्हणाले आहेत.

आजपासून तीन दिवस राज ठाकरेंचा पुण्यात मुक्काम, ठाकरे घेणार शाखाध्यक्षांच्या बैठका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून (२८ जुलै) पुन्हा एकदा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी काळातील निवडणूका लक्षात घेता राज ठाकरे सक्रिय झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ४२ प्रभागात शाखाध्यक्षांच्या बैठका घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे प्रत्येक शाखाध्यक्षाशी थेट बोलणार आहेत. विशेष म्हणजे आजपासून सुरु होणारा पुणे दौरा राज ठाकरे यांचा १५ दिवसांच्या आत हा दुसरा तीन दिवसाचा दौरा आहे. पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी सर्व मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, प्रभाग प्रमुख आदींशी चर्चा केली. या दौऱ्यात राज ठाकरे हे स्वतः पक्षाचे पदाधिकारी निवडण्यासाठी मुलाखती घेणार आहेत. या मुलाखती नवी पेठेतील पक्षाच्या कार्यालयात होणार असून थोड्याच वेळात राज ठाकरे कार्यालयात दाखल होणार आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करताना दिसत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेही आता तयारीला लागले आहेत. त्यांनी नाशिक, पुणे या दोन शहरांचा पंधरा दिवसांपूर्वीच दौरा केला होता. आता पुन्हा राज ठाकरे आजपासून पुणे शहराच्या तीन दिवसाच्या दौर्‍यावर आले आहेत. या दरम्यान शहरातील मध्यवर्ती कार्यालयात इच्छुक शाखा अध्यक्षांच्या स्वतः मुलाखती घेऊन त्यांची निवड करणार आहेत.

महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे कंबर कसून तयार!

महानगरपालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच कंबर कसलेली आहे हे दिसून येतंय. मनसे नेते अमित राज ठाकरे आज(२८ जुलै) नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुण्यात आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांना ऑडिओ क्लिप्स पाठवल्या?, राज ठाकरे म्हणतात….

News Desk

“ती काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती”, राऊतांची मिश्लिल टिप्पणी  

News Desk

मुंबई आणि पुणे येथील कोरोना तपासणी केंद्रांना मान्यता; अमित देशमुख यांची माहिती

swarit